आधारशी संबंधित नवोन्मेष आणि तंत्रज्ञान सहकार्य योजना (SITAA) Scheme for Innovation and Technology Association with Aadhaar (SITAA) ही युआयडीएआयची एक धोरणात्मक योजना असून, भारताच्या ओळख तंत्रज्ञान (ID Tech) परिसंस्थेभोवती मुक्त नवोन्मेष आणि सहनिर्मितीची संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. SITAA हा संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि परिसंस्था भागीदारीच्या माध्यमातून भारताची डिजिटल ओळख परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील नवोन्मेष आणि सहकार्य उपक्रम आहे. या उपक्रमाची उद्दिष्टे ओळख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे.ओळख तंत्रज्ञान (ID Tech) क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला सक्षम करणे.संशोधन आणि सहनिर्मितीला प्रोत्साहन व पाठबळ देणे.आधारशी सुसंगत उपयोगाच्या विविध संकल्पना व अनुप्रयोगांना सक्षम करणे.जागतिक स्तरावरील मानकांशी सुसंगत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) उपाय विकसित करणे.हा उपक्रम कोणासाठी आहे? SITAA ही परिसंस्थेतील विविध घटकांमधील नवोन्मेषकांसाठी तयार करण्यात आली आहे: स्टार्टअप्स: डिजिटल ओळख क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणारे प्रारंभिक तसेच विस्ताराच्या टप्प्यातील स्टार्टअप्स.शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्था: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), गोपनीयता, बायोमेट्रिक्स, सायबरसुरक्षा आणि सर्वसमावेशक डिजिटल प्रणाली या क्षेत्रांत कार्यरत विद्यापीठे व संशोधन संस्था.उद्योग आणि तंत्रज्ञान सेवा प्रदाते: प्रगत व परिपक्व ओळख तंत्रज्ञानावरील उपाय विकसित करणाऱ्या स्थापित कंपन्या आणि तंत्रज्ञान सेवा प्रदाते.SITAA अंतर्गत सहभागी घटकांना मिळणारे लाभ आर्थिक सहाय्यमार्गदर्शन व मेंटरशिपयुआयडीएआयच्या चाचणी वातावरणाची सुविधाव्यावसायिक नेटवर्कशी जोडणीगुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल (VC) पर्यंत प्रवेशप्रमाणपत्र आणि मान्यता अधिक माहितीसाठी : https://beta.uidai.gov.in/en/sitaa